Home / News / लोकार्पण करुन सरकार खोके काढतय! आदित्यचा घणाघात

लोकार्पण करुन सरकार खोके काढतय! आदित्यचा घणाघात

मुंबई-लोकार्पण करुन सरकार स्वत:साठी खोके काढत आहे असा घणाघात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई-लोकार्पण करुन सरकार स्वत:साठी खोके काढत आहे असा घणाघात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, १० जून २०२४ पर्यंत मागच्या वर्षीचे साडेसहा हजार कोटी आणि या वर्षीचे साडेसहा हजार कोटी या दोन्ही घोटाळ्यातून नक्की किती रस्ते मुंबईत झाले आहेत. किती टक्के काम झाले आहे. जनतेला हे धक्कादायक वाटत असेल, पण मला आधीपासून माहिती होत की काम होणे शक्य नाही. सरकारच्या आवडत्या कंत्राटदारांबद्दल मी बोललो होतो. या दोन वर्षात मुंबईत काँक्रिटीकरणाचे फक्त नऊ टक्के काम झाले आहे. भाजपा ,मिंधे सरकार पंतप्रधानांना बोलवून सतत भूमीपूजन करत असतात. पण खरंच त्या कामांना पुढे काही अर्थ असतो का? भाजपावाले आणि मिंधे सरकार स्वतःसाठी खोके काढतात का ? आता पुन्हा एकदा या राजवटीने पाच तारखेला पंतप्रधानांना ठाणे,मुंबई येथे भूमिपूजनांसाठी बोलावले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या