न्यू जर्सी – सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या पत्नी, चित्रमहर्षी व्ही शांताराम यांची कन्या व अभिनेत्री दुर्गा जसराज यांची आई तसेच लेखिका, दिग्दर्शिका मधुरा जसराज यांचे आज अमेरिकेतील न्यू जर्सी इथे निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात दुर्गा व श्रीरंग देव पंडित अशी दोन मुले आहेत.मधुरा जसराज यांनी अनेक वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत लेखिका, दिग्दर्शिका, कोरिओग्राफर व निर्माता म्हणून काम केले. २०१० साली त्यांनी आई तुझा आशीर्वाद या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. भारतीय शास्त्रीय संगीताचे जतन व संवर्धन करण्यात मधुरा जसराज यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. १९६२ साली पंडित जसराज यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. चित्रमहर्षी व्ही शांताराम आणि पंडित जसराज यांच्या कार्याचे जतन करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. २००९ साली विख्यात गायक पंडित जसराज यांच्यावरील संगीत मार्तंड पंडित जसराज या माहितीपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
लेखिका, दिग्दर्शिकामधुरा जसराज यांचे निधन
