कॅलिफोर्निया – कॅलिफोर्नियाच्या महामार्ग क्रमांक १५ वर लिथियम बॅटरी घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला आग लागल्यामुळे या महामार्गावरची वाहतूक दिवसभर ठप्प झाली. ही वाहतूक अन्य मार्गावर वळवण्यात आल्याने त्या ठिकाणीही मोठी वाहतूक कोंडी झाली.कॅलिफोर्नियाला लास वेगास बरोबर जोडणाऱ्या आंतरराज्य महामार्ग १५ वर बाकर या गावाजवळ ही घटना घडली. लिथियम बॅटरी घेऊन जाणारा एक ट्रक वजनामुळे उलटला व त्याला आग लागली. ही आग इतकी भयानक होती की त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक तातडीने थांबवण्यात आली. ७५ हजार पौंडापेक्षाही अधिक वजनाच्या या ट्रकला सरळ करण्यासाठीची यंत्रसामुग्री उपलब्ध न झाल्यामुळे ही वाहतूक कोंडी अधिकच वाढली. त्यानंतर या महामार्गावरील वाहतूक ४० क्रमांकाच्या महामार्गावर वळवण्यात आली. तिथेही मोठी वाहतूक कोंडी झाली. अखेर दहा तासांच्या प्रयत्नानंतर अमेरिकन पोलिसांनी एका बाजूची वाहतूक सुरु करण्यात यश मिळवले.
लिथियम बॅटरीचा ट्रक उलटला कॅलिफोर्नियातील वाहतूक ठप्प
