लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकिंग
पर्यटकाचा दरीत पडून मृत्यू

पुणे : लिंगाणा किल्ल्यावरती ट्रेकिंग करण्यासाठी आलेल्या मुंबई येथील ग्रुपमधील एक पर्यटक खोल दरीत पडल्याची घटना घडली. अजय काळे असे या पर्यटकाचे नाव असून, ते ६२ वर्षांचे होते. खोल दरीत पडल्याने काळे यांचा मृत्यू झाला. किल्ले लिंगाणा हा रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असला तरी या किल्ल्यावर जाण्यासाठी वेल्हे तालुक्यातून मार्ग आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितल्या प्रमाणे, पनवेल येथील एक ट्रेकरचा ग्रुप ट्रेकिंगसाठी येथे आला असता यातील अनुभवी ट्रेकर्स असणारे अजय काळे हे ट्रेकिंग दरम्यान चक्कर येऊन खोल दरीत कोसळले. दरी जवळपास ४०० फूट खोल असल्याने त्यांना शोधण्यात उशीर झाला आणि त्यांचा मृत्यू झाला.

Scroll to Top