महाड- महायुतीने निवडणुकीच्या काळात महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपयांएवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप हे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले नाहीत. २,१०० रुपये महिलांना कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबबत बोलताना रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले म्हणाले की, सुरुवातीला हे पैसे देताना आमची घाईगडबड झाली. पण आता २१०० रुपये देण्यापूर्वी नवीन सर्व्हे केले जातील. यामध्ये कोणाकडे किती वाहने आहेत, वगैरे त्रुटीदेखील तपासल्या जाणार आहेत. मात्र,या महिलांचे १५०० रुपये हे बंद होणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत म्हणाले की, रायगडला लवकरच न्याय दिला जाईल. पालकमंत्री पदावरुन काही चांगल्या गोष्टी होणे बाकी आहेत. त्या लवकरच पूर्ण होतील आणि याचा तिढा सुटेल.
लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा नवीन सर्व्हे होणार! भरत गोगावलेंची माहिती
