‘लाडकी बहीण’ योजनेला थंडा प्रतिसाद २ ऑगस्टपासून शिंदे गटाची विशेष मोहीम

मुंबई – राज्यात सध्या जोरदार चर्चा असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेला प्रत्यक्षात महिलांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या योजनेचा अधिक प्रसार करण्यासाठी शिवसेना शिंदे गट २ ऑगस्टपासून विशेष मोहीम राबविणार आहे. थोडक्यात या योजनेमुळे राज्यातील नारी शक्ती मतपेटीमधून भरभरून प्रतिसाद देईल हा विश्वास डळमाळीत होताना दिसतो आहे. महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच ठाणे जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेला समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही.मुंबई शहर, पालघर आणि उपनगरातही योजनेला कमी प्रतिसाद मिळाल्याने महायुतीमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण येथे विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये योजनेचा प्रसार करण्यासाठी विधानसभानिहाय मोहीम राबविण्यात येणार आहे.दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात योजने’ला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. येथे एकूण 8,63,178 महिलांनी अर्ज केले आहेत. पुणे जिल्ह्यानंतर सर्वाधिक अर्ज कोल्हापूर जिल्ह्यातून दाखल झाले आहेत. या जिल्ह्यात योजनेचा लाभ घेण्यासाठी एकूण 6,33,668 महिलांनी अर्ज भरले आहेत. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये 6,33,295, अहमदनगरमध्ये 6,32,298 आणि सोलापूरमध्ये 5,42,867 महिलांनी अर्ज भरले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर जिल्हा प्रतिसादाच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण 5,09,340 महिलांनी अर्ज भरले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top