मुंबई – महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर योजनेच्या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झारखंड सरकारवर सडकून टीका केली आहे.
झारखंडमध्ये महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ‘मैय्या सन्मान योजना’ सुरु करण्यात आली आहे. यात महिलांना दरवर्षी १२ हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेद्वारे झारखंडमधील सरकारने आमच्या लाडकी बहीण योजनेची नक्कल केली आहे हे सपशेल दिसत आहे. भक्कम अर्थव्यवस्था आणि महसुलाच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. आम्ही योजना दीर्घकाळ राबवूच. मात्र, झारखंडमध्ये त्यांची योजना प्रभावीपणे कशी राबवता आणि टिकवता येईल याची काळजी करावी, असे अजित पवार यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र सरकारची लाडकी योजना ही मध्ये प्रदेश प्रदेशमधील योजनेचीच कॉपी आहे.
लाडकी बहीण योजनेची कॉपी अजित पवारांची झारखंडवर टीका
