मुंबई – महाराष्ट्रात महायुतीस सरकारने आणलेल्या माझी लाडकी बहीण योजनेमुळे हा विजय मिळाला,असे मत रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मांडले.
हा निकाल म्हणजे एक मोठा घोटाळा आहे, असा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेला आरोप आठवले यांनी फेटाळून लावला.
आमचा विजय झाला की गैरप्रकार झाल्याचा कांगावा करणे ही राऊत यांची जुनी खोड आहे. लोकसभेत आमचे १७ उमेदवार तर इंडिया आघाडीचे ३१ उमेदवार निवडून आले. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांची सत्ता पुन्हा आली. यामध्ये त्यांना कुठेही घोटाळा झाल्याचे दिसत नाही,असा टोला आठवले यांनी लगावला.