मुंबई – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना लाडकी बहीण, कुटुंब भेट ही मोहीम राबविले जाणार आहे.या मोहिमेच्या माध्यमातून शिवसैनिक राज्यातील घरा-घरात पोहोचणार आहेत.मुख्यमंत्री शिंदे स्वतः घरोघरी जाऊन लोकांशी थेट संवाद साधणार आहेत. प्रत्येक कुटुंबाला सरकारच्या धोरणांचा लाभ मिळत आहे किवा नाही याची चौकशी केली जाणार आहेत. योजना पोहोचल्या नसतील तर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शिवसैनिक संबंधितांना मदत करणार आहेत.त्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाला दररोज किमान दहा घरांना भेट देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे शिवसैनिक घरोघरी जाऊन महिला आणि त्यांच्या नातेवाईकांना भेटून शासकीय योजनांबद्दल माहिती देतील.
‘लाडकी बहीण’नंतर शिंदेंची आता’लाडकी बहीण, कुटुंब भेट’ मोहीम
