सातारा – जनतेने जर पुन्हा सत्तेची सूत्रे अधिक ताकदीने हाती सोपविली तर लाडकी बहीण योजनेची रक्कम दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये केली जाईल,अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे पुन्हा दिली. महायुतीचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते कोरेगाव येथील सभेत बोलत होते. याप्रसंगी महेश शिंदे यांचा माझा लाडका आमदार असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला.महेश शिंदे यांनी कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या पैशाने कोवीड सेंटर उभारले आणि त्याच्या माध्यमातून शेकडो लोकांचे प्राण वाचवले,अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी महेश शिंदे यांचे कौतुक केले. त्याचबरोबर त्यांनी खिचडी घोटाळा, बॉडीबॅगी घोटाळा आणि बोगस कोवीड सेंटर घोटाळ्याचा उल्लेख करीत उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. एका बाजुला स्वतःच्या पैशातून कोवीड सेंटर उभारणारे महेश शिंदे तर दुसऱ्या बाजुला महामारीच्या काळात खिचडी, बॉडीबॅग आणि बोगस कोवीड सेंटरसारख्या घोटाळ्यात पैसे खाणारे यांच्यामधून कोणाची निवड करायची याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे,असे शिंदे म्हणाले.मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात मागील अडीच वर्षांच्या काळात सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा उल्लेख करीत या योजना अशाच सुरू राहाण्यासाठी महायुतीच्याच उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |