मुंबई – मुंबईतील एका कंत्राटदाराकडून २५ लाख रुपयांची लाच मागितल्या आणि घेतल्याप्रकरणी विशाखापट्टणमचे विभागीय रेल्वे (डीआरएम) व्यवस्थापक सौरभ प्रसाद यांना सीबीआयने अटक केली. या कारवाईमुळे रेल्वे विभागात एकच खळबळ उडाली.
सौरभ प्रसाद यांनी मेकॅनिकल शाखेशी संबंधित एका टेंडरच्या संदर्भात कंत्राटदाराकडून २५ लाख रुपयांची मागणी केली होती. लाच घेण्यासाठी सौरभ प्रसाद मुंबईत पोहोचले होते. मात्र दिल्लीहून आलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ अटक केली. अटकेनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी विशाखापट्टणम येथील त्यांच्या कार्यालयाची आणि घराची झडती घेतली. तेथून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली. सौरभ प्रसाद १९९१ च्या बॅचचा रेल्वे मेकॅनिकल इंजिनीअरिंग अधिकारी आहे. त्यांची वर्षभरापूर्वी विशाखापट्टणम येथे डीआरएम म्हणून नियुक्ती झाली होती.