मुंबई- वांद्रे टर्मिनस येथे झालेल्या अंत्योदय एक्स्प्रेसमधील चेंगराचेंगगरीच्या घटनेनंतर भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये विहित मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. १०० बाय १००बाय ७० सेमीपेक्षा अधिक आकाराचे आणि ७५ किलोपेक्षा अधिक वजनाचे सामान डब्यातून नेताना आढळल्यास प्रवाशांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
लांब पल्लाच्या गाड्यांमध्ये प्रवास करताना ५ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना त्यांच्या वजनाच्या निम्या वजनाचे सामानासह प्रवास करण्याची मुभा आहे. प्रवाशांना रेल्वे डब्यांच्या श्रेणीनुसार ३५ ते ७० किलो सामान प्रवासी डब्यातून नेण्यास परवानगी असून यामध्ये १० ते १५ किलोपर्यंत सूट देण्यात येते. स्कूटर, सायकल आणि अन्य सामानांसह १०० बाय १०० बाय ७० सेमीपेक्षा मोठ्या आकाराच्या सामानावर वजनामध्ये देण्यात येणारी सूट ग्राह्य नसेल.
लांब पल्ल्याच्या रेल्वेत सामान नेण्यावर निर्बंध
