राजौरी – जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्कराची रुग्णवाहिका रस्त्यावरून घसरली आणि खोल दरीत पडली. या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक आणि एका जवानाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले तर ३ जवान जखमी झाले आहेत. तिन्ही जवानांची प्रकृती चिंताजनक आहे.
लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, ही घटना नियंत्रण रेषेजवळ डुंगी गालाजवळ घडली. भरधाव वळणावर रुग्णवाहिकेच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रुग्णवाहिका दरीत कोसळली. या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक आणि एका जवानाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. नंतर बचाव कर्मचार्यांनी त्यांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले. ही घटना शनिवारी दुपारी घडली. या अपघातात एक जवान शहीद झाले आहेत. यातील जवान राजौरी जिल्ह्यातील तर दुसरा मृत व्यक्ती बिहारचा रहिवासी असल्याची माहिती लष्करातील अधिकाऱ्यांनी दिली.
लष्कराची रुग्णवाहिका दरीत कोसळली! एका जवानासह दोघांचा मृत्यू! 3 जखमी
