लंडन – ‘जुनं ते सोनं ‘ या उक्तीची प्रचिती लंडनमधील एका लिलावात आली आहे. कारण या लिलावात दुर्मिळ असलेल्या १९२६ सालच्या मॅकॅलन सिंगल माल्ट व्हिस्कीच्या एका बाटलीला तब्बल २.७ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच २२ कोटी रुपये इतकी किंमत मिळाली आहे.
अनेक मद्यप्रेमी वर्षानुवर्ष जुन्या असलेल्या मद्याला जास्त पसंती देतात.त्यासाठी ते लाखो रुपये मोजतात. मात्र लंडनच्या लिलावात ठेवण्यात आलेली मॅकॅलनची व्हिस्की जणू ते अमृत असल्याचा भास मद्य प्रेमींना झाला असावा.ही सिंगल माल्ट विस्की पहिल्यांदा १९२६ साली तयार करण्यात आली.ती तब्बल ६० वर्षे चांगली मुरत ठेवून १९८६ साली बाटलीमध्ये काढण्यात आली होती.जगभरात अशा फक्त ४० बाटल्या बनविल्या होत्या.काही मद्यप्रेमी असे उंची मद्य आपल्या संग्रही ठेवत असतात.ती मोठी शान समजतात.२२ कोटी रुपयांना विकल्या गेलेल्या या व्हिस्कीच्या बाटलीवरील लेबल हे इटलीतील प्रख्यात चित्रकार व्हॅलेरियो अॅदामी यांनी रेखाटले आहे.हे लेबल धारण करणाऱ्या मॅकॅलन १९२६ सिंगल माल्ट व्हिस्कीच्या जगात फक्त १२ बाटल्या आहेत.त्यामुळे या व्हिस्कीची बाटली दुर्मिळ स्वरूपातील बनल्याने ती अशी किंमती ठरली.