लंडन – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाज विकेट मिळवण्यात अपयशी ठरत असल्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माची निराश झाला होता. या नैराश्यातून त्याने आपल्या एका सहकाऱ्याला भरमैदानात शिव्या दिल्या. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
टी-ब्रेकच्या आधी जेव्हा रवींद्र जडेजा आपले पहिले षटक टाकण्यासाठी आला, तेव्हा रोहित शर्माने एका खेळाडूला क्षेत्ररक्षणासाठी पाठवले, परंतु त्याने क्षेत्ररक्षणाच्या ठिकाणी जायला उशीर केला. त्यावर वैतागलेल्या रोहितने त्याला एक शिवी दिली. चाहत्यांनी केलेल्या व्हिडिओत ती स्पष्ट एकू येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर चाहत्यांनी रोहितला ट्रोल केले.
रोहित शर्माने भर मैदानात सहकाऱ्याला केली शिवीगाळ
