मुंबई – रोहा रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा,अशी मागणी प्रवासीवर्गाची होती. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे अखेर मध्य रेल्वेने रोहा स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर दहा गाड्यांना थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. उद्या शनिवार २५ जानेवारीपासून रोहा स्थानकात दहा एक्स्प्रेस गाड्या थांबविण्यात येणार आहेत.
रोहा स्थानकात थांबणार्या गाड्यांमध्ये ट्रेन क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्स्प्रेस ही २६ जानेवारी रोजी रोह स्थानकात थांबेल. तसेच १११०० मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २५ जानेवारी रोजी, २२६२९ दादर-तिरुनेलवेली एक्स्प्रेस ३० जानेवारी, २२६३० तिरुनेलवेली -दादर एक्स्प्रेस ३० जानेवारी रोजी, १२२१७ कोचुवेली-चंदिगड एक्स्प्रेस २६ जानेवारी रोजी, १२२१८ चंदिगड कोचुवेली एक्स्प्रेस ३० जानेवारी, २०९३१ कोचुवेली – इंदूर एक्स्प्रेस २५ जानेवारी रोजी, हिसार-२०९३२ कोइम्बतूर एक्स्प्रेस २९ जानेवारी रोजी, २२४७५ कोइम्बतूर-हिसार एक्स्प्रेस ३० जानेवारी रोजी आणि २२४७६ कोइम्बतूर-हिसार एक्स्प्रेस २६ जानेवारी रोजी रोहा स्थानकात थांबेल.
रोहा स्थानकांवर थांबणार १० एक्स्प्रेस रेल्वे गाड्या
