मुंबई – शिधापत्रिकाधारकांसाठी केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानामधून धान्य दिले जाणार नाही. अशा शिधापत्रिकाधारकांची नावे वगळण्यात येणार आहेत.