नवी दिल्ली- भारतीय रेल्वेमधील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे आपल्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार आहे. तशा आशयाचे पत्र रेल्वे बोर्डाने सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिले आहे. कर्मचारी कमीत कमी २ वर्षी किंवा वयाच्या ६५ वर्षांपर्यंत काम करु शकतील.
रेल्वेच्या १ ते ७ या श्रेणीमध्ये काम करणारे कर्मचारी यासाठी पात्र असतील. ही नियुक्ती कंत्राटी पद्धतीने होणार असून त्यांना कंत्राटदाराच्या मार्फत वेतन दिले जाणार आहे. रेल्वेत सध्या सुपरवायजर व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेत भरती झाली नसल्याने सध्याच्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे. हा ताण कमी करण्यासाठी व नव्याने तरुण कर्मचाऱ्यांची भरती करुन त्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या पदावर काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे. याला रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे पाहावे लागणार आहे.