नवी दिल्ली – रेल्वेची तिकीटे आरक्षित करण्याची कालमर्यादा आता केवळ ६० दिवस करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. याआधी भारतीय रेल्वेची तिकीटे १२० दिवस आधी आरक्षित करता येत होती. येत्या १ नोव्हेंबर पासून ही कालमर्यादा केवळ ६० दिवस करण्यात आलेली आहे. प्रवासाचा दिवस वगळता हे आरक्षण करता येणार आहे. रेल्वे बोर्डाने या संदर्भातील पत्र सर्व विभागीय व्यवस्थापकांना पाठवले आहे. १ नोव्हेंबरपासून केवळ ६० दिवसांपर्यंतच्या प्रवासासाठीचेच आरक्षण करता येणार आहे.३१ ऑक्टोबर पर्यंत १२० दिवस आधीच्या प्रवासासाठीचे आरक्षण करता येणार असून त्यानंतर मात्र केवळ ६० दिवस आधीच आरक्षण करता येतील. रेल्वे बोर्डाचे प्रवासी मार्केटिंग विभागाचे संचालक संजय मनोचा यांनी हे पत्र सर्व विभागीय व्यवस्थापकांना पाठवले आहे. परदेशी नागरिकांसाठी असलेली ३६५ दिवस आधी आरक्षण करण्याची मुदत जैसे थे ठेवण्यात आली आहे.
रेल्वेची तिकीटे आरक्षित करण्याची कालमर्यादा आता केवळ ६० दिवस
