रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

  • सहा मंत्र्‍यांचाही शपथविधी

नवी दिल्ली-भाजपा आमदार रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या दिल्लीच्या चौथ्या तर देशाच्या १८ व्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. हा शपथविधी सोहळा आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास रामलीला मैदानावर पार पडला. त्यांना दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी भाजपाचे आमदार प्रवेश वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, रवींद्र इंद्रराज आणि पंकज सिंग यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली.

या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा, राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांच्यासह विविध केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top