रॅपर कोस्टा टिचचा स्टेजवर
गाताना अचानक मृत्यू

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचा लोकप्रिय रॅपर आणि कलाकार कोस्टा टिच याचा काल रात्री स्टेजवर गाताना अचानक मृत्यू झाल्याने त्याचे चाहते हळहळ व्यक्त करत आहे. कोस्टा टिचच्या या शेवटच्या शोचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
27 वर्षीय कोस्टा टिच शनिवारी जोहान्सबर्गमधील अल्ट्रा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये गात होता. तिथे उपस्थित असलेले सर्वजण त्यांच्या गाण्यावर नाचत देखील होते. यावेळी मग अचानक तो खाली कोसळला. तिथे उभ्या असलेल्या लोकांनी त्याला उभे केले. लोकांना वाटते की, तो अडखळला आणि पडला असावा. दुसऱ्याच क्षणी तो पुन्हा कोसळला. थोड्या वेळाने त्याचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, कोस्टा टिचचे मूळ नाव कोस्टा त्सोबानोग्लू होते. मात्र तो कोस्टा टिच या नावाने ओळखला जायचा. तो स्वातीनी आणि मोझांबिकच्या सीमेजवळील म्बोम्बेला येथील एक उदयोन्मुख कलाकार होता. त्याच्या सर्वात यशस्वी सिंगल, बिग फ्लेक्साला युटूबवर 45 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत.

Scroll to Top