रुपया विक्रमी निचांकी पातळीवर डॉलरसाठी ८७.९४ रुपये लागणार

मुंबई – भारतीय रुपया आज विक्रमी निचांकी पातळीवर पोहोचला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ४४ पैशांनी घसरला आणि एका डॉलरसाठी ८७.९४ रुपये मोजावे लागणार आहे. याआधी डॉलरच्या तुलनेत रुपया ८७.५० वर बंद झाला होता. रुपयांच्या घसरणीमुळे परदेशी वस्तू महागणार आहेत.भारतीय चलनातील घसरणीमागे अनेक कारणे आहेत. यात सर्वात पहिले कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड टॅम्प यांनी सुरु केलेले टेरिफ वॅार आहे. टॅम्प यांनी स्टिल आणि अॅल्युमिनियमच्या आयातीवर २५ टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणी केली होती. त्यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून याचा दबाव रुपयावरही पडत आहे. शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदार सातत्याने विक्री करत असल्याचा फटकाही रुपयाला बसत आहेय यासह आरबीआय परकीय चलनाचा साठा करत असल्याने आगामी काळात रुपया आणखी पडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top