नवी दिल्ली – अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी रुपया २७ पैशांनी घसरून रुपया ८६.३१ या नव्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला.रुपयाच्या या सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे देशात सर्वच क्षेत्रातील महागाई वाढणार आहे.भारत मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आणि डाळींची आयात करतो.रुपयाचे मुल्य घसरल्याने डॉलरचा दर वधारला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च महाग झाल्याने तेल आणि डाळी महाग होण्याची शक्यता आहे. रुपयाच्या घसरणीमुळे शिक्षण, प्रवास, डाळी, खाद्यतेल, कच्चे तेल, संगणक, सोने, औषधे, रसायने, खते आणि अवजड यंत्रसामुग्री अशा सर्व आयात वस्तू आणि सेवा महाग होण्याची शक्यता आहे.मजबूत अमेरिकन डॉलर आणि अस्थिर जागतिक बाजारपेठ, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, परकीय गुंतवणुकीचा आटता ओघ आणि देशांतर्गत शेअर बाजारातील नकारात्मक वातावरण ही रुपयाच्या घसरणीमागील प्रमुख कारणे आहेत,असे तज्ज्ञांनी सांगितले.
रुपयाची नवी नीचांकी पातळी १ डॉलरला ८६.३१ वर पोहोचला
