मुंबई- मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई-रीवा आणि पुणे-जबलपूर विशेष गाड्यांच्या ५२ फेऱ्या वाढवल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई ते रीवा आणि पुणे आणि जबलपूर दरम्यान धावणाऱ्या आणि कालावधी वाढवलेल्या विशेष गाड्यांमध्ये सीएसएमटी मुंबई-रीवा विशेष ०२१८८ गाडीच्या १३ फेर्या २७ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. तर ०२१८७ रीवा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या विशेष गाडीच्या १३ फेर्या
२६ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पुणे-जबलपूर विशेष ०२१३१ या गाडीच्या १३ फेर्या ३० सप्टेंबरपर्यत आणि ०२१३२ जबलपूर-पुणे विशेष गाडीच्या १३ फेर्या २९ सप्टेंबरपर्यंत पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. या गाड्या सुटण्याचा दिवस, वेळ,संरचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नाही. विशेष शुल्कावर विशेष ट्रेन क्रमांक ०२१८८ आणि ०२१३१ च्या विस्तारित फेऱ्यांसाठी बुकिंग २९ जूनपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे.