मुंबई- रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उद्या मंगळवार 6 जून रोजी सायंकाळी 5 वाजता दलित पँथर या संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्त दलित पॅंथर संघटनेत काम केलेल्या जुन्याजाणत्या पॅंथर कार्यकर्त्यांचा सन्मान आणि दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. दलित पँथरच्या या सुवर्ण महोत्सवी सोहळयात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या सोहळयाचे नागपुरमधील सिव्हील लाईन, आमदार निवास समोर, डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळयाचे अध्यक्षस्थान रिपाइंचे राष्ट्रीय संघटन सचिव पॅंथर भुपेश थुलकर भुषविणार आहेत. या कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत साहित्यीक नेते अर्जुन डांगळे, माजी राज्यमंत्री आणि रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, रिपाइंचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा सरवदे, दिलीप जगताप, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, दयाल बहादुरे, भिमराव बनसोड, सुधाकर तायडे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रिपाइंतर्फे प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली.
दलित पँथर सुवर्ण महोत्सव सोहळयाचे आयोजन रिपाइंचे राजन वाघमारे, विनोद थुल, बाळासाहेब घरडे, डाँ. मनोज मेश्राम, अँड. विजय आगलावे यांनी केले आहे. या सोहळयास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे.