नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधींनी दिल्ली विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहाला दिलेल्या भेटीवर दिल्ली विद्यापीठाने आक्षेप घेतला आहे. विद्यापीठाच्या प्रॉक्टर रजनी अब्बी यांनी आरोप केला की, परवानगी न घेता राहुल गांधी अचानक आल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जेवणदेखील मिळाले नाही.
.
राहुल गांधी शुक्रवारी दुपारी दिल्ली विद्यापीठाच्या नॉर्थ कॅम्पस पोस्ट ग्रॅज्युएट मुलांच्या वसतिगृहात पोहोचले आणि तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी त्यांच्या करिअरच्या योजनांविषयी चर्चा केली. वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांसोबत त्यांनी जेवणही केले. त्यानंतर राहुल गांधींच्या भेटीला आक्षेप घेत अब्बी यांनी सांगितले की, राहुल गांधींनी परवानगीशिवाय दिल्ली विद्यापीठाला भेट दिली. हे काही सार्वजनिक ठिकाण नाही. तुम्ही दुपारच्या जेवणाच्या वेळी आलात त्यावेळी फक्त ७५ लोकांसाठी जेवण तयार केले होते, पाच-सहा लोक जास्त आले तर ठिक, मात्र तुमच्याबरोबर अनक जण आले, हे लोक इथले विद्यार्थीही नाहीत. हे सर्व योग्य नाही. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना त्रास झाला. त्यावेळी जेवण न मिळाल्याची लेखी तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी दिली आहे.
राहूल गांधी यांच्या अचानक दिल्ली विद्यापीठ भेटीवर आक्षेप
