मुंबई- काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा मंगळवार २० ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात विशेष दौरा आयोजित केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा आहे. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी मुंबईत बैठक घेऊन राज्यातील काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीसाठी काँग्रेसचे अन्य काही राष्ट्रीय नेते ही उपस्थित राहणार आहेत.
राहुल गांधी २०ऑगस्टला महाराष्ट्र दौऱ्यावर
