राहुल गांधींविरोधात पुन्हा मानहानीचा दावा
भाजपाचा पाठलाग सुरूच! 12 एप्रिलला सुनावणी

हरिव्दार – माजी खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात आणखी एक मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारीमध्ये त्यांच्या ‘भारत जोडो\’ यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध केलेल्या वक्तव्यामुळे उत्तराखंडमधील हरिद्वार न्यायालयात आरएसएस कार्यकर्ता कमल भदौरिया यांच्या तक्रारीवरून वकील अरुण भदौरिया यांनी हा गुन्हा दाखल केला. त्याची सुनावणी 12 एप्रिल रोजी होणार आहे. याआधी 24 मार्च रोजी सूरत न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवत त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आणि यामुळे त्यांना लोकसभेचे सदस्यत्व आणि सरकारी बंगला गमवावा लागला.
काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप खासदार सुशील मोदी यांनी देखील राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी पाटणाच्या खासदार आमदार न्यायालयाने राहुल गांधींना 12 एप्रिलला हजर राहण्यास सांगितले आहे. ही बाब मोदी आडनावाशीही संबंधित आहे. मात्र, राहुल गांधी 12 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
कमल भदौरिया यांनी आपल्या तक्रारीत दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मिरमधील कलम 360 रद्द केले, मुस्लीम महिलांना ‘तीन तलाक\’मधून दिलासा दिला, राममंदिर उभारणीचे काम सुरू आहे. देशात कोणतेही संकट आले तरी आरएसएस महत्वाची जबाबदारी पार पाडतो. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांनी 9 जानेवारी 2013 रोजी कुरुक्षेत्र अंबाला येथील एका कार्यक्रमात आरएसएसचा उल्लेख 21 व्या शतकातील कौरव असा केला आहे. राहुल गांधी म्हणाले होते की, आजचे कौरव खाकी पँट परिधान करतात, हातात काठी घेतलेले असतात.
हा देश पुजाऱ्यांच्या नव्हे तर तपस्वी लोकांचा आहे, असे राहुल गांधी म्हटले होते. त्यांच्या या विधानाने मानहानी झाल्याचे भदौरिया यांचे मत आहे. मोदी आडनाव प्रकरणावरून सूरत न्यायालयाप्रमाणे बिहारमध्येही राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी त्यांना पाटना येथे 12 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. त्याबाबत न्यायालयाने त्यांना नोटिस पाठवली आहे. या प्रकरणात 6 जुलै 2019 रोजी राहुल गांधी हे पाटना न्यायालयात हजर होते. तेव्हा त्यांना जामीन मिळाला होता. आता पाटनाच्या विशेष एमपी एमएलए कोर्टात त्यांना उपस्थित राहावे लागणार आहे, असे भाजप नेता सुशील मोदी
यांनी सांगितले.

Scroll to Top