सुलतानपूर- राहुल गांधी २६ जुलै रोजी उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरला गेले होते. त्यावेळी ते वाटेत एका मोचीच्या दुकानात थांबून त्यांनी चप्पल आणि बुटाची दुरुस्ती केली. या चप्पलला आता लाखोंची बोली लागत आहे. मात्र मोची रामचैत ती विकण्यास तयार नाही.
याबाबत मोची रामचैत यांनी सांगितले की, राहुल यांनी शिवलेल्या चप्पल विकत घेण्यासाठी लोक फोन करत आहेत. दुकानात लांबून लोक येत आहेत. ते मागाल ती किंमत देण्याबद्दल बोलतात. पैसे भरून पिशवी देतो पण चप्पल द्या असे आमिष दाखवले जात आहे. चप्पलसाठी १ लाख रुपयांपर्यंतच्या ऑफर मिळाल्या आहेत. एका व्यक्तीने तर पैसे भरलेली बॅग देतो असे फोनवर सांगितले पण आम्ही त्यांना चप्पल विकण्यास नकार दिला. हे आमच्या नेत्याचे प्रतीक आहे, ते आम्ही जपणार आहोत.