मुंबई-लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज मुंबईचा दौरा केला. या दौर्यात त्यांनी धारावीत जाऊन तिथल्या व्यावसायिकांशी संवाद साधला.
राहुल गांधी आज सकाळी मुंबई दौऱ्यावर आले. मुंबई विमानतळावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार, भाई जगताप, नसीम खान, सतेज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर दुपारी ते धारावीला गेले. सुरुवातीला त्यांनी चामड्याच्या मार्केटला भेट दिली. तिथल्या एका स्टुडिओतही गेले. राहुल गांधींना भेटण्यासाठी धारावीकरांची मोठी गर्दी केली होती. राहुल यांनी तिथल्या मजूर, व्यावसायिकांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
राहुल गांधींनी धारावीतील मजुरांशी संवाद साधला
