नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढलेला असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राहुल गांधी यांची तब्येत काल अचानक बिघडल्याने ते काल सदर बाजार विधानसभा मतदारसंघातील शहजादा बाग येथील प्रचार सभेलाही संबोधित करु शकले नाहीत.राहुल गांधी यांची आजची दिल्लीच्या मुस्तफाबाद येथील प्रचार मिरवणूक रद्द करण्यात आली. ते दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातील बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या जय बापू जय भीम जय संविधान मिरवणूकीतही सहभागी होऊ शकले नाहीत. त्यानंतर आज त्यांचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले. काल सदर बाजारमध्ये आयत्या वेळी राहुल गांधी यांनी तब्येतीमुळे हजर राहू शकत नसल्याचे सांगत आपला संदेश पाठवला. या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, मला माहित आहे की माझ्यावर प्रेम करणारे हजारो लोक या सभेला उपस्थित आहेत. मी आपल्याला आवाहन करतो की दिल्लीत काँग्रेसला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे. मी लवकरच दिल्लीतील प्रचारात सहभागी होईन आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करेन.
राहुल गांधींची तब्येत बिघडल्याने दिल्लीतील प्रचाराचे कार्यक्रम रद्द
