नाशिक – बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे राष्ट्रीय जनहित पक्षातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे आज जाहीर केले. त्यांनी पक्षाच्या ४ उमेदवारांची घोषणादेखील केली. गेल्या आठवड्यात त्यांनी वर्सोव्यातून निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले होते.
संजय पांडे पुढे म्हणाले की, आम्ही १० उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत. मी स्वतः वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. देवळाली मतदारसंघातून शामराव भोसले निवडणूक लढवणार आहे. ही निवडणूक समविचारी पक्षांसोबत लढण्याबाबत माझी चर्चा सुरू आहे. याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. महाराष्ट्रातील उर्वरित जागांवर उमेदवारी देण्याबद्दलही चाचपणी सुरू असून त्याबद्दलदेखील लवकरच घोषणा करण्यात येईल.