वॉशिंग्टन -अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सुत्रे हाती घेतल्यापासून अनेक कठोर निर्णय घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना आता सरकारी कर्मचारीदेखील डोईजड झाले आहेत. ट्रम्प प्रशासनाने वीस लाख सरकारी कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव दिला आहे.ट्रम्प प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा भार कमी करायचा आहे. त्यासाठी सरकारने स्वेच्छानिवृत्तीचा हा आकर्षक प्रस्ताव दिला आहे.डीफर्ड रेझिग्नेशन प्रोग्रॅम असे या योजनेचे नाव आहे. कर्मचाऱ्यांनी आपला आजवरचा हिशेब घेऊन राजीनामे द्यावेत. मात्र त्यानंतरही सप्टेंबर २०३० पर्यंत कर्मचारी सरकारच्या पे रोलवर राहतील, अशी ही योजना आहे.या योजनेवर निर्णय घेण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने कर्मचाऱ्यांना ६ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देली आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पना सरकारी कर्मचारी डोईजड
