नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा त्याचप्रमाणे हे चिन्ह वापरण्याचा अधिकार नेमका कोणाला असेल या विषयीची सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. १३ नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाला शरद पवारांचा फोटो न वापरण्याचे आदेश देत घड्याळ चिन्ह वापरताना हे न्याप्रविष्ट आहे असा मजकुर लिहिणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते.सर्वोच्च न्यायालयात उद्या होणाऱ्या सुनावणीत अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत असल्याचे सांगावे लागणार असून त्या संदर्भातील दाखलेही द्यावे लागणार आहेत. गेल्या सुनावणीत अजित पवार यांच्या वकिलांनी आम्ही निर्देशांचे पालन करत असल्याचे सांगत काही छायाचित्रे दाखवली होती. त्यावर शरद पवारांचे वकील सिंघवी यानी अजित पवार गट सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन करत नसल्याचे पुरावे न्यायालयात दाखल केले होते. राज्यात २० नोव्हेंबरला मतदान आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा काय परिणाम होतो हे पाहावे लागणार आहे.
राष्ट्रवादी पक्ष तसेच चिन्हा विषयी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
