राष्ट्रपती मुर्मू यांचे सुखोईतून उड्डाण
जगातील दुसर्‍या महिला राष्ट्रपती

गुवाहाटी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शनिवारी सकाळी 11 वाजून 8 मिनिटांनी सुखोई विमानाने उड्डाण केले. त्यांनी आसाममधील तेजपूर एअर फोर्स स्टेशनवरून सुखोई 30 एमकेआय फायटर जेटने उड्डाण केले.
सुमारे 30 मिनिटांनी म्हणजेच हे लढाऊ विमान 11.38 वाजता उतरले. मुर्मू यांच्यापूर्वी 2009 मध्ये देशाच्या 12 व्या राष्ट्रपती प्रतिभादेवी सिंह पाटील यांनी सुखोईमध्ये उड्डाण केले होते. प्रतिभा पाटील यांनी सुखोई उडवून दोन विश्वविक्रम केले होते. सुखोई उडवणार्‍या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तर एखाद्या देशातील सर्वात वृद्ध महिला ठरल्या आहेत. तेव्हा प्रतिभा पाटील 74 वर्षांच्या होत्या. त्यांचे नाव गिनीज बुकमध्येही नोंदवले गेले आहे.
राष्ट्रपती मुर्मू या तिन्ही सैन्य दलाच्या कमांडर असल्याने त्यांना सैन्याची शक्‍ती, शस्त्रे आणि धोरणात्मक माहिती दिली गेली होती. राष्ट्रपती मुर्मू यांच्या आधी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील आणि रामनाथ कोविंद यांनीही हवाई दलाच्या लढाऊ विमानातून उड्डाण केले आहे. डॉ. कलाम यांनी राष्ट्रपती असताना 8 जून 2006 रोजी सुखोई उडवले होते. असे करणारे ते देशाचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांच्या पाठोपाठ प्रतिभाताई पाटील सुखोईने उड्डाण केले आणि आता असे करणार्‍या द्रौपदी मुर्मू या तिसर्‍या राष्ट्रपती ठरल्या आहेत.

Scroll to Top