राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३० नोव्हेंबरला पुण्यात

पुणे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३० नोव्हेंबर रोजी पुणे शहरात येणार आहेत. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाला (एएफएमसी) त्या भेट देणार आहेत. एनडीएच्या १४५ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा ३० नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. याच निमित्ताने राष्ट्रपती मुर्मू पुण्यात येणार आहेत.

लष्कराच्या सर्वोच्च प्रमुख या नात्याने राष्ट्रपती मुर्मू लष्कराच्या या दोन्ही संस्थांच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पुढील वर्षी जानेवारीमध्ये प्रबोधिनीची ७५ वर्षे पूर्ण होणार असून त्या निमित्ताने एनडीएच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एनडीए ही लष्कराच्या तिन्ही दलांना एकत्रितपणे प्रशिक्षण देणारी देशासह जगातील आघाडीची प्रशिक्षण संस्था आहे. एएफएमसीनेही आपल्या स्थापनेचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले. याच निमित्ताने विविध कार्यक्रम होत असून वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी एएफएमसीला ‘प्रेसिडेंट्स कलर अवॉर्ड’ने गौरविण्यात येणार आहे. या निमित्ताने एएफएमसीमध्ये १ डिसेंबर रोजी हाेणाऱ्या कार्यक्रमालाही राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top