रायगड- आज रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. रायगड जिल्ह्याला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक भागात नद्या ओसंडून वाहू लागल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यात रोहा शहरातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे शहरात अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. महाड शहरातही काही भागात पाणी चढले होते. जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असल्याने रोहा, श्रीवर्धन, माणगाव, महाड, पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळा आणि काॅलेजला सुट्टी जाहीर केली होती. तर रोहा शहरात पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना आणि यंत्रणेला सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून दिला होता . अंबा नदीला पुर आल्याने नंदीचे पाणी नागोठणे शहरात शिरले आणि शहराला वेळाचं घातला . परिणामी शहराचा संपर्क तुटला.
रायगडच्या सर्व शाळांना सुट्टी
