अयोध्या – अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनासाठी भाविकांच्या गर्दीत वाढ होत असून त्यामुळे रामलल्ला मंदिराचे दरवाजे एक तास आधी उघडले जाणार आहेत. याआधी सकाळी ७ वाजता उघडणारे मंदिराचे दरवाजे आता सकाळी ६ वाजल्यापासून उघडणार आहेत.रामलल्लांच्या मंदिराचे दरवाजे आता दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत उघडे राहणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. सकाळी सकाळी अयोध्येत दर्शन घेऊन पुढे इतर ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांचीही त्यामुळे चांगली सोय होणार असून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रात्रीही आरामात दर्शन घेता येणार आहे. रामलल्लाच्या मंदिराचे दरवाजे आधी पहाटे ४ वाजता उघडले जातात व काकड आरतीनंतर ते बंद केले जातात. त्यानंतर ते सहा वाजल्यापासून पुन्हा उघडले जाणा
रामलल्ला मंदिराच्या दर्शन वेळेत एक तासाने वाढ
