राममंदिरासाठी पाठवण्यात येणाऱ्या
सागवान लाकडाची काष्ठपूजन

चंद्रपूर – अयोध्येमध्ये उभारण्यात येणाऱ्या राममंदिराच्या बांधकामाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी गडचिरोलीतील सागवान लाकडाचा वापर करण्यात येणार आहे. हे सागवान लाकूड आलापल्लीहून बल्लारपूरमध्ये काल दाखल झाले होते. आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या सागवानाची विधिवत काष्ठपूजन केली आणि त्यानंतर बल्लारपूर ते चंद्रपूर अशी मोठी शोभायात्रा काढण्यात आली.
या यात्रेसाठी चंद्रपूर आणि बल्लारपूर शहर एखाद्या नववधूसारखे सजवण्यात आणि सुशोभित करण्यात आले होतेे. बल्लारपूर शहरातील मुख्य मार्गावर सर्वत्र स्वागतकमानी लावण्यात आल्या होत्या. रोषणाईसोबत पहाटेपासून ध्वनिक्षेपकावर रामनामाची धून सुरू होती. संपूर्ण बल्लारपूर शहर रामनामात तल्लीन झाले. चंद्रपूर शहरातदेखील महाकाली मंदिर ते गांधी चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शनी चौक, वरोरा नाका, चांदा क्लबपर्यंत सजावट करण्यात आली होती.

Scroll to Top