रामनवमीनिमित्ताने निघालेल्या शोभायात्रेवर दगडफेक

बडोदा- गुजरातच्या बडोदा शहारता रामनवमीच्या दिवशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीच्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावची स्थिती निर्माण झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दगडफेक करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून शोधले जात आहे. गुरुवारी बडोद्यात रामनवमीनिमित्त शोभायात्रा काढली जात होती. ही शोभायात्रा फतेपुरा गराना पोलीस ठाण्याजवळ आल्यानंतर अचानक दगडफेकीची घटना घडली. त्यानंतर दोन गटात जोरदार दगडफेक सुरू झाली. मशिदीजवळ दोन गटात राडा झाला. घटनास्थळी तत्काळ पोलीस दल दाखल झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. बडोदा पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Scroll to Top