मुंबई : धर्मगुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘राधे माँ’चा मुलगा हरजिंदर सिंह अभिनय क्षेत्रात त्याचे नशीब आजमावणार आहे. लवकरच ओटीटीवरील एका मालिकेत तो झळकणार आहे. अभिनेता रणदिप हुड्डासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसिरीजमधून तो ओटीटीवर पदार्पण करणार आहे.
हरजिंदर इन्स्पेक्टर अविनाश या वेब सीरिजमध्ये एसटीएफ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. रणदीप हुड्डाबरोबर त्याने या सीरिजमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. इन्स्पेक्टर अविनाश एक चांगली वेब सीरिज असल्याचे या मालिकेबाबत बोलताना हरजिंदर सिंग याने म्हटले आहे. या मालिकेची कथा ९०च्या दशकातील उत्तरप्रदेशातील लोकांवर प्रकाश टाकणारी आहे. या सीरिजमध्ये तरुण पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून, उत्कृष्ट कामगिरीने छाप पाडू इच्छिणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असल्याचे हरजिंदर याने म्हटले आहे. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी हरजिंदर वेगवेगळ्य़ा प्रकारच्या भूमिका करण्यासाठी उत्सुक आहे.