रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत‎ फटाके वाजवण्यास बंदी‎

नाशिक – प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या‎ सूचनेनुसार वायू प्रदूषण करणारे फटाके रात्री १० ते सकाळी ६ या‎ कालावधीत वाजविण्यास बंदी‎ घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन‎ करणाऱ्यांवर महापालिका व पोलिसांची नजर‎ असणार आहे. फटाके वाजवताना वायू प्रदूषण‎ वाढणार नाही याची काळजी घेण्याबाबत ‎महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून आवाहन‎ करण्यात आले.‎ केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शुद्ध हवा‎ कार्यक्रमांतर्गत झालेल्या सर्वेक्षणात नाशिकचा ‎क्रमांक १३१ आला. गेल्या वर्षभरापासून‎ महापालिका शहरातील वायुप्रदूषण कमी‎ करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता‎ दिवाळीत मोठ्या प्रमाणात वायू आणि‎ ध्वनी प्रदूषण होण्याची भीती असून या‎ पार्श्वभूमीवर महापालिकेने हा निर्णय जाहीर ‎केला.‎

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top