मुंबई – भायखळयातील जिजामाता उद्यान अर्थात राणीची बाग ही पेनग्विन पक्षांच्या आगमनापासून पर्यटकांचे आकर्षण बनली आहे.राणीच्या बागेत विशेष कक्षात ठेवलेल्या पेनग्विनच्या देखभालीचा खर्च इतर प्राण्यांच्या तुलनेने जास्त येत असला तरी तो एक प्रमुख आकर्षण बिंदू असल्याने पर्यटकांपासून होणाऱ्या उत्पन्नातही वाढही झाली आहे. त्यामुळे खर्चापेक्षा मिळकत अधिक होत आहे .डिसेंबर २०२१ ते ऑगस्ट २०२४ या चार वर्षांच्या कालावधीत पेनग्विनच्या देखभालीवर १४ कोटी ४१ लाख रुपये खर्च झाला. दुसरीकडे एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०१४ या दीड वर्षांच्या कालावधीत राणीच्या बागेला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या ४६ लाख होती . त्यातून पालिकेला १६ कोटी रूपये उत्पन्न मिळाले आहे . बहुतांश पर्यटक हे केवळ पेनग्विन पाहण्यासाठी आले होते हे स्पष्ट आहे. म्हणजे पेनग्विनच्या देखभालीवर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत त्यांच्यापासून मिळणारे उत्पन्न अधिक आहे.ऑक्टोबर २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कोएक्स अॅक्वेरियममधून तीन नर आणि पाच मादी पेनग्विन राणीच्या बागेत आणण्यात आले.या प्रकल्पाला बऱ्याच जणांनी विरोध केला होता. पेनग्विनची संख्या आता १८ वर पोहोचली आहे.