अमरावती – हनुमान जयंती व खासदार नवनीत राणा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हनुमान चालिसाचे पठण केल्यानंतर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमानाची 111 फूट उंचीची मूर्ती उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. शहरातील छत्री तलावाच्या पुढे 10 एकर जागेवर ही मूर्ती उभारण्यात येणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लवकरच भूमिपूजन केले जाणार आहे, अशी माहिती आमदार रवी राणा यांनी
दिली आहे.
या विशाल मूर्तीच्या उभारणीचे काम दिल्ली येथील एका वास्तुकला कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. हनुमानजीची मूर्ती बसवली जाणार त्याचे सँपल दिल्लीहुन राणा यांच्या घरी पोहोचले आहे. या हनुमान मूर्तीसमोरच राणा दाम्पत्यांनी हनुमान चालिसा पठण केले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाच्या मुद्यावरून राणा दाम्पत्यांना 14 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला.
राणा दाम्पत्य 111 फुटांची