राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याची भेट घेतली. वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरी ही भेट झाली.’येक नंबर’ या आगामी मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे सलमानच्या घरी आले होते,असे सांगण्यात आले. उद्या संध्याकाळी वांद्रे येथील ताज लँडस एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरेंच्या या भेटीमुळे अलिकडच्या काळात राजकारणी मंडळी सलमान खानला एवढे महत्त्व का देत आहेत,असा प्रश्न विचारला जात आहे. कारण याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेकदा सलमानच्या घरी गेले आहेत. आता राज ठाकरे यांनी सुमारे तासभर खर्च करून सलमान खानला नेमके कसले आमंत्रण दिले याची चर्चा होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top