राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढविणार

मुंबई – मनसेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आक्रमक भूमिका घेतली असून, यावेळी सत्तेत येणारच अशी गर्जना केली आहे. इतकेच नव्हे तर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपला पुत्र अमित ठाकरे याला मैदानात उतरवित माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे! अमित ठाकरे यांना राजकारणाचा जेमतेम अनुभव असूनही त्यांना उमेदवारीची लॉटरी लागली आहे. शिंदेंची शिवसेना आणि भाजपा यांच्या पाठिंब्यावर अमित ठाकरे बाजी मारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसेने आज आपल्या 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. वरळीमधून आदित्य ठाकरेंच्या विरुद्ध संदीप देशपांडे यांना तिकीट देण्यात आले आहे. मनसेचे दिवंगत गोल्ड मॅन माजी आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना
खडकवासलामधून तिकीट देण्यात आले आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची शिवडी मतदारसंघातून यापूर्वीच उमेदवारी जाहीर झाली आहे. मनसेच्या या पहिल्या यादीत शिरीष सावंत, वीरेंद्र जाधव, गजानन काळे, राजेश येरुणकर, महेश फारकासे, साईनाथ बाबर, नयन कदम या सर्व जुन्या आणि निष्ठावंत पदाधिकार्‍यांचा समावेश आहे . मुंबईतील बहुतेक मतदारसंघात मनसेने उमेदवार जाहीर केले आहेत. मनसेच्या पहिल्या यादीत मयुरी थोरवे व संगीता चेंदवणकर या महिलांचाही समावेश आहे.
कल्याण ग्रामीण माहीम – प्रमोद (राजू) रतन पाटील, माहीम – अमित राज ठाकरे, भांडूप पश्‍चिम – शिरीष गुणवंत सावंत, वरळी – संदीप सुधाकर देशपांडे, ठाणे शहर – अविनाश जाधव, मुरबाड – श्रीमती संगिता चेंदवणकर, कोथरूड – किशोर शिंदे, हडपसर – साईनाथ बाबर, खडकवासला – मयुरेश रमेश वांजळे, मागाठाणे – नयन प्रदीप कदम, बोरीवली – कुणाल माईणकर, दहिसर – राजेश येरुणकर, दिंडोशी – भास्कर परब, वर्सोवा – संदेश देसाई, कांदिवली पूर्व – महेश फरकासे, गोरेगांव – विरेंद्र जाधव, चारकोप – दिनेश साळवी, जोगेश्वरी पूर्व – भालचंद्र अंबुरे, विक्रोळी – विश्वजित ढोलम, घाटकोपर पश्चिम – गणेश चुक्कल, घाटकोपर पूर्व – संदीप कुलथे, चेंबूर – माऊली थोरवे, चांदिवली – महेंद्र भानुशाली, मानखुर्द – शिवाजीनगर – जगदीश खांडेकर, ऐरोली – निलेश बाणखेले, बेलापूर – गजानन काळे, मुंब्रा-कळवा – सुशांत सूर्यराव, नालासोपारा – विनोद मोरे, भिवंडी पश्चिम – मनोज गुळवी, मीरा-भाईंदर – संदीप राणे, शहापूर – हरिश्चंद्र खांडवी, गुहागर – प्रमोद गांधी, कर्जत-जामखेड – रवींद्र कोठारी, आष्टी – कैलास दरेकर, गेवराई – सौ.मयुरी बाळासाहेब म्हस्के, औसा – शिवकुमार नागराळे, जळगांव शहर – डॉ. अनुज पाटील, वरोरा – प्रवीण सूर, सोलापूर दक्षिण – महादेव कोगनुरे, कागल – रोहन निर्मळ, तासगांव-कवठे महाकाळ – वैभव कुलकर्णी, श्रीगोंदा – संजय शेळके, हिंगणा – विजयराम किनकर, नागपूर दक्षिण – आदित्य दुरुगकर, सोलापूर शहर-उत्तर – परशुराम इंगळे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top