मुंबई :- महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणाची आज असलेली सुनावणी तहकूब करण्यात आली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात १२ मे रोजी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीविरूद्ध महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने आरोप पत्र सादर केले होते. यामध्ये अनेक आरोप हे अजित पवार यांच्यावर करण्यात आले आहेत. मात्र ईडीच्या आरोप पत्रात अजित पवार आणि त्यांच्या पत्नीचे नाव नसल्याचे समोर आले. दरम्यान, न्यायालयाने अद्याप आरोपींची दखल घेतली नाही. तर हे प्रकरण राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याने येणाऱ्या १२ मे रोजी सुनावणीमध्ये नेमके काय होते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी पुढील सुनावणी १२ मे रोजी
