परभणी
राज्यात थंडीची चाहूल लागली असताना आज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी 25 ते 27 नोव्हेंबरदरम्यान वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 24 नोव्हेंबरपासून राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी पंजाब डंख यांनी आज युटूबवर व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत पंजाब डख यांनी सांगितले की, मराठवाडा, विर्दभ, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीतील काही भागांत पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह कोरडे हवामान राहणार आहे. हा पाऊस सर्वदूर पडणार नाही. एखाद्या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. असे असले तरी द्राक्षबागायतदारांनी आपल्या पिकांची काळजी द्यावी.
राज्यासह मराठवाड्यात 25 नोव्हेंबरपासून पाऊस
