मुंबई- राज्यातील अनेक भागात मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत.त्यातच हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला वर्तवला आहे. तसेच २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
राज्यातील विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे.नांदेड,लातूर, परभणी, सांगली,सातारा,धाराशिव, सोलापूर,कोल्हापूर,कोकण, अहमदनगर ,पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे.या जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे. देशातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू आहे.हा पाऊस आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले.हवामान तज्ज्ञांच्या मते,दोन-चार दिवस दिल्लीतसह अनेक राज्यांमध्ये पाऊस बरसत राहील.हवामान विभागाने काल बुधवारी दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागात ढगाळ पावसाचा अंदाज जारी केला होता.