मुंबई- राज्यात १० जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून मान्सून माघारी फिरला आहे. मात्र परतीचा पाऊस अजूनही सुरू असून राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचे हवामान खात्याच्या तज्ज्ञांनी सांगितले. हवामान खात्याने पुढील काही दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून काही जिल्ह्यांमध्ये गारपीटदेखील होऊ शकते असा अंदाज आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. परतीच्या पावसासाठी ही स्थिती पूरक असून त्यामुळे पुढील काही दिवसांत पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,धुळे,अहिल्यानगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. गारपिटीचा या भागातील कांदा, द्राक्ष, डाळिंबासह इतर शेती पिकांना मोठा फटका बसणार असून शेतकऱ्यांचे पुन्हा मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |